Aadhaar आणि ड्रायव्हिंग लायसन्स लिंक कसे करावे? ऑनलाईन प्रोसेस जाणून घ्या Adhar-Driving licence Linking

Adhar-Driving licence Linking:केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहनधारकांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स आणि नोंदणीकृत वाहन क्रमांक ऑनलाइन अपडेट करण्याची सुविधा सुरू केली आहे. आता आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज नाही parivahan.gov.in आधार ऑथेंटिकेशनद्वारे मोबाइल नंबर लिंक अपडेट आणि कन्फर्म करता येईल. वाहन (RC) आणि ड्रायव्हिंग लायसन्स (DL) या दोन्हीची प्रक्रिया ऑनलाइन उपलब्ध आहे ज्यामुळे थेट मोबाइलवर सरकारी अपडेट्स मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आता वाहन क्रमांक आणि ड्रायव्हिंग लायसन्सशी आता मोबाइल नंबर आणि आधार ऑनलाइन लिंक केले जाणार आहे. parivahan.gov.in पोर्टलवरील ‘वाहन’ आणि ‘ सारथी ‘ या पर्यायांद्वारे ही प्रक्रिया पूर्ण करता येईल. वाहन क्रमांक आणि ड्रायव्हिंग लायसन्सशी आता मोबाइल नंबर आणि आधार ऑनलाइन लिंक केले जाणार आहे. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसन्सधारक आणि नोंदणीकृत वाहनधारकांसाठी ऑनलाइन मोबाइल क्रमांक हा अपडेट करण्याची सुविधा सुरू केली आहे. यामुळे आता तुम्हाला यासाठी आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज नाही.

आता तुम्हाला तुमचा मोबाइल क्रमांक अपडेट करणे आणि आधारशी लिंक करण्याची संपूर्ण प्रक्रिया parivahan.gov.in या पोर्टलवर उपलब्ध असणार आहे. तुम्हाला आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स वाहन क्रमांक आणि ड्रायव्हिंग लायसन्सशी कसा लिंक करावा, तसेच हा का लिंक करावा लागतो, याविषयीची माहिती पुढे विस्ताराने जाणून घेऊया.

या ठिकाणी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की, वाहनमालक आणि परवानाधारकांना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग या मंत्रालयाकडून एक मेसेज पाठविण्यात येत आहे. तुम्हालाही हा मेसेज आला असेल. या मेसेजमध्ये त्यांना आधार व्हिरेफिकेशन प्रक्रियेद्वारे त्यांच्या नोंदणीकृत वाहनाचा मोबाइल क्रमांक लिंक, अपडेट आणि पुष्टी करण्यास सांगितले जात आहे. आता त्यासाठी parivahan.gov.in जाऊन तुम्ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. पोर्टलवर वाहन आणि सारथी नावाचे दोन QR कोड तुम्हाला दिसतील, ज्याद्वारे तुम्ही या सगळ्या गोष्टी अपडेट करू शकता.

वाहनासाठी मोबाइल नंबर अपडेट कसा करावा? याविषयीची माहिती पुढे दिली आहे. चला तर मग जाणून घेऊया.

वाहनासाठी मोबाइल नंबर अपडेट कसा करावा?

सर्वप्रथम parivahan.gov.in या वेबसाईटवर जावे लागेल.

यानंतर तुम्हाला आधारच्या माध्यमातून मोबाइल नंबर अपडेटचा पर्याय निवडावा लागेल.

त्यानंतर तुम्हाला गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर, चेसिस नंबर आणि इंजिन नंबर भरावा लागेल.

तसेच, नोंदणीची तारीख आणि वैधता देखील सांगावी लागेल.

व्हेरिफिकेशन कोड टाकून सबमिट करून प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

आता ड्रायव्हिंग लायसन्स (DL) साठी मोबाइल नंबर अपडेट कसा करावा? याविषयीची माहिती पुढे दिली आहे. चला तर मग जाणून घेऊया.

ड्रायव्हिंग लायसन्स (DL) साठी मोबाइल नंबर अपडेट कसा करावा?

यासाठी तुम्हाला पोर्टलवरील सारथी QR कोड स्कॅन करावा लागेल किंवा संबंधित पेजला भेट द्यावी लागेल.

यानंतर तुम्हाला तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्ससोबत विनंती केलेली माहिती भरावी लागेल.

तसेच तुम्हाला तुमची जन्म तारीख, राज्याचे नाव आणि कॅप्चा कोड काळजीपूर्वक भरावा लागेल.

प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला खाली दिलेल्या सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.

वर सांगितलेली प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि आधार तुमच्या वाहन किंवा ड्रायव्हिंग लायसन्सशी लिंक होईल. हे आपल्याला भविष्यातील कोणत्याही सरकारी अपडेट्स किंवा सूचनांची माहिती थेट आपल्या मोबाइलवर देईल.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment