लाडकी बहीण योजना अपडेट : महिलांसाठीच्या योजनेत सरकारचा मोठा निर्णय

Ladki Bahin Yojana scheme update : महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

योजनेंतर्गत सुरुवातीला गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवर महिलांच्या पतसंस्था सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु प्रत्यक्षात अपेक्षेनुसार महिला पुढे आल्या नसल्याने, शासनाने हा निर्णय बदलत प्रत्येक जिल्ह्यात केवळ एकच पतसंस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

पतसंस्थेसाठी आवश्यक अटी

  • पतसंस्था सुरू करण्यासाठी किमान १५,००० महिला सभासद असणे आवश्यक.
  • प्रारंभीचे भांडवल किमान १० लाख रुपये असणे बंधनकारक.
  • ८ मार्च २०१९ रोजी जारी परिपत्रकानुसार विविध क्षेत्रांसाठी वेगवेगळ्या अटी :
    • वॉर्ड विभाग : १,००० महिला सदस्य व १५ लाख रुपये भांडवल.
    • महानगरपालिका क्षेत्र : ८०० सदस्य व १० लाख रुपये भांडवल.
    • मुंबई व नवी मुंबई महानगरपालिका : २,००० सदस्य व ३० लाख रुपये भांडवल.
    • इतर महापालिका क्षेत्र : १,५०० सदस्य व २० लाख रुपये भांडवल.

महिलांचा सहभाग कमी

जिल्हा, तालुका किंवा गाव पातळीवर पतसंस्था उभारण्यासाठी अपेक्षित प्रमाणात महिला पुढे आल्या नाहीत. त्यामुळे शासनाने सर्वत्र वेगवेगळ्या पतसंस्था न सुरू करता फक्त जिल्हा पातळीवरच एक पतसंस्था सुरू करण्याचे ठरवले आहे.

बचत गटांचा आधार

ग्रामीण भागात आधीच विविध महिला बचत गट कार्यरत आहेत. त्यामुळे या बचत गटांच्या मदतीने जिल्हा पातळीवरील पतसंस्था कार्यान्वित करण्यावर भर दिला जाणार आहे.

थोडक्यात, महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेतून पतसंस्था उभारण्याचा शासनाचा महत्त्वाकांक्षी निर्णय महिलांच्या कमी सहभागामुळे मर्यादित करण्यात आला आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment