Bandhkam Kamgar Yojana Registration Renewal free: इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी/नुतनीकरण करण्याकरीता भरावयाची नोंदणी/नुतनीकरण फी निःशुल्क करणेबाबत.
इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या रोजगाराचे व सेवाशर्तीचे नियमन करण्यासाठी तसेच बांधकाम कामगारांची सुरक्षा, आरोग्य आणि त्यांच्याकरीता कल्याणकारी उपाययोजना करण्यासाठी केंद्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार विनियमन व सेवाशर्ती) अधिनियम, १९९६ लागू केला आहे.
त्यास अनुसरुन इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार विनियमन व सेवाशर्ती) अधिनियम, १९९६ च्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार विनियमन व सेवाशर्ती) नियम, २००७ तयार करण्यात आले आहेत. सदर अधिनियमाच्या कलम १८ अन्वये राज्यात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.
राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांची मंडळामार्फत नोंदणी व नुतनीकरण करण्यात येते. मंडळाकडे जमा होणाऱ्या उपकराच्या निधीमधून मंडळामार्फत नोंदीत सक्रिय (जिवीत) बांधकाम कामगारांकरीता २९ विविध कल्याणकरी योजना राबविल्या जातात. सदर योजनांची शैक्षणिक सहाय्य योजना, आरोग्य विषय योजना, आर्थिक सहाय्य योजना, सामाजिक सुरक्षा व अन्य या प्रकारांत वर्गवारी करण्यात आलेली आहे.
सन २०२० पासून बांधकाम कामगारांची नोंदणी, नुतनीकरण व लाभ वाटप ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर केली जात आहे. उक्त अधिनियमातील तरतूदीनुसार यापूर्वी इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी मंडळाकडे करण्यासाठी नोंदणी शुल्क रु. २५/-इतके निर्धारित करण्यात आले होते.
तद्नंतर शासनाच्या संदर्भिय क्र.१ येथील पत्रान्वये बांधकाम कामगारांची नोंदणी/नुतनीकरण करण्याबाबतच्या शुल्काच्या रकमेत बदल करुन सदर शुल्काची रक्कम रु.१/- करण्यात आली होती. सद्यस्थितीत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी व नुतनीकरण शुल्क माफ करणेबाबत मंडळाच्या दिनांक ०६.०३.२०२५ रोजीच्या बैठकीत ठराव पारित करण्यात आला आहे.
त्यास अनुसरुन महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी व नुतनीकरण शुल्क माफ करणेबाबतचा प्रस्ताव मंडळाने संदर्भिय क्र.३ येथील पत्रान्वये शासनास मान्यतेस्तव सादर केला आहे.
त्यास अनुसरुन महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी व नुतनीकरण शुल्क माफ करणेबाबत मंडळाने शासनास सादर केलेल्या प्रस्तावास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती
शासन निर्णय :-
इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार विनियमन व सेवाशर्ती) अधिनियम, १९९६ मधील कलम १२ (३) व कलम ६२ (२) (g) मधील नमूद तरतुदीनुसार इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी/नुतनीकरण करण्याकरीता भरावयाची नोंदणी/नुतनीकरण फी (नोंदणी शुल्क) निःशुल्क करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.
३. सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून, त्याचा संगणक संकेतांक २०२५०८१३१२२६२४६८१० असा आहे. तसेच सदर शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
प्रतः-महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,