Big Relief for Motorists : १५ ऑगस्टपासून सोलापूरसह देशभरातील बिगर व्यावसायिक (कार) वाहनचालकांना टोल प्रवासात मोठी सवलत मिळणार आहे. केवळ ३,००० रुपये एकदाच भरून तुम्ही वर्षभरात २०० टोल फेऱ्या (एक टोल = एक फेरी) सवलतीच्या दरात करू शकता.
सवलतीची मुख्य वैशिष्ट्ये
- ही सुविधा फक्त बिगर व्यावसायिक चारचाकी वाहनांसाठी लागू आहे.
- ३,००० रुपयांचा रिचार्ज केल्यानंतर २०० फेऱ्यांपर्यंत सवलत मिळेल.
- एकदा पैसे भरल्यानंतर ही सवलत देशभरातील कोणत्याही टोल नाक्यावर लागू राहील.
- फास्टॅग असणे बंधनकारक; फास्टॅग नसल्यास दुप्पट टोल भरावा लागेल.
- व्यावसायिक (कमर्शिअल) वाहनांना ही सवलत मिळणार नाही.
सध्याचे टोल दर
- फास्टॅग असलेल्या चारचाकी वाहनांसाठी एकमार्गी टोल ₹७५.
- २४ तासांच्या आत परत आल्यास परतीच्या प्रवासासाठी ₹३५ टोल.
- २४ तासांनंतर परत आल्यास पुन्हा ₹७५ आकारला जातो.
- फास्टॅग नसल्यास एकमार्गी प्रवासाचा टोल ₹१५०.
बचतीचा हिशोब
आत्ताच्या दरांनुसार २०० फेऱ्यांसाठी एका कारचालकाला सुमारे ₹११,००० टोल भरावा लागतो. नव्या योजनेमुळे हेच प्रवास केवळ ₹३,००० मध्ये होऊ शकतील. म्हणजेच किमान ₹८,००० ची बचत होणार आहे. तसेच आता २४ तासांच्या मर्यादेची अट राहणार नाही.
सवलत कशी मिळवावी?
- आपल्या अँड्रॉईड मोबाईलमधील Google Play Store उघडा.
- “Rajmarg Yatra – NHAI” हे अॅप डाउनलोड करा.
- अॅपवर लॉगिन करून वाहन क्रमांक टाका.
- ₹३,००० चे पेमेंट करा.
- पेमेंट पूर्ण झाल्यावर सवलत तत्काळ लागू होईल.