Gold Price Today: सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण,१० तोळा सोनं ८८०० रुपयांनी स्वस्त; २४ – २२ कॅरेटचे आजचे दर किती?

Gold Price Today:सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या दरामध्ये रक्षाबंधनानंतर सलग तिसऱ्या दिवशी मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे आज सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. आज २४ कॅरेटच्या १ तोळा सन्याच्या दरात ८८० रुपयांनी घसरण झाली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

हे सोनं आज १,०१,४०० रुपयांवर आले आहे. पण हे सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला जीएसटीसह अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. आज सोनं खरेदी करण्यासाठी जाण्यापूर्वी १८, २२ आणि २४ कॅरेटचे दर किती ते घ्या जाणून…

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज १८, २२ आणि २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ८८० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,०१,४०० रुपये मोजावे लागणार आहे.

काल हेच सोनं खरेदीसाठी १,०२,२८० रुपये द्यावे लागले होते. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरात तब्बल ८,८०० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १०,१४,००० रुपये द्यावे लागणार आहे. याच सोन्याचा कालचा दर १०,२२,८०० रुपये इतका होता.

आज २२ कॅरेटचे सोन्याचे दर देखील कमी झाले आहेत. २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ८०० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला ९२,९५० रुपये मोजावे लागणार आहेत.

काल हेच सोनं ९३,७५० रुपयांनी विकले गेले. २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरात ८,००० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ९,२९,५०० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर हेच सोनं काल ९,३७,५०० रुपयांना होते.

आज १८ कॅरेट सोन्याच्या दरामध्ये ६६० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज ७६,०५० रुपये मोजावे लागणार आहेत. हेच सोनं काल ७६,७१० रुपयांना खरेदी करावे लागले. तर १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याचे दर ७,६०,५०० रुपयांवर आले आहेत.

त्यामुळे आज सोनं खरेदी करण्यासाठी चांगली संधी आहे. आज चांदीचे दर देखील घसरले आहेत. १ ग्रॅम चांदीच्या दरात २ रुपयांनी घसरण झाली असून त्याची किंमत ११५ रुपये इतकी झाली आहे. तर १ किलो चांदीच्या दरात २००० रुपयांनी घसरण झाली असून ते खरेदीसाठी तुम्हाला आज १,१५,००० रुपये द्यावे लागतील.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment