Maharashtra Toll Naka Annual Pass List : १५ ऑगस्टपासून केंद्र सरकारकडून वार्षिक फास्टॅग पास सुरू करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत वाहनधारकांना वर्षभर किंवा जास्तीत जास्त २०० वेळा मोफत टोल प्रवास करण्याची सुविधा मिळणार आहे.
हा पास ₹३,००० मध्ये उपलब्ध होईल आणि त्याचा वापर राष्ट्रीय महामार्ग (National Highways) आणि एक्सप्रेसवेवर करता येईल. मात्र राज्यमहामार्ग (State Highways) किंवा नगरपालिकेच्या टोल प्लाझांवर या पासचा उपयोग होणार नाही.
यामुळे विशेषतः सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या वार्षिक फास्टॅग पासचा उपयोग होणारे प्रमुख महामार्ग व टोल प्लाझे
सरकारने जाहीर केलेल्या यादीप्रमाणे महाराष्ट्रात खालील ९६ हून अधिक टोल प्लाझांवर या पासचा लाभ घेता येणार आहे –
पश्चिम महाराष्ट्र व कोकण
- चारोटी, खानीवाडे – सुरत-दहिसर
- अहमदनगर बायपास
- तिडगुंडी – सोलापूर-विजापूर
- तसावडे, किणी – सातारा-कागळ
- सावळेश्वर, वरवडे, पाटस, सरडेवाडी – पुणे-सोलापूर
- आनेवाडी – खंडाळा-सातारा
- खेड-शिवपूर – पुणे, कात्रज मार्ग
उत्तर महाराष्ट्र
- चांदवड, लालींग – पिंपळगाव-धुळे
- बसवंत – पिंपळगाव-नाशिक-गोंडे
- घोटी, अर्जुनल्ली – वडापे-गोंडे
- चाचाडगाव – नाशिक-पेठ
- डोंगराळे – कुसुंबा-मालेगाव
- पिंपरखेड – चाळीसगाव-नांदगाव-मनमाड
मराठवाडा
- बंपिप्री – अहमदनगर-घोगरगाव-सोलापूर बॉर्डर
- निमगाव खालू – अहमदनगर-वाशुंडे फाटा
- करोडी, हातनूर – औरंगाबाद परिसर
- माळीवाडी, पादळसिंगी, पारगाव – येडशी-औरंगाबाद मार्ग
- वैद्याकीन्ही – मांजरसुम्बा-चुंभळीफाटा
- नायगाव, लोणी – परतूर-माजलगाव
विदर्भ
- गोंधखैरी, करंजा घाडगे – नागपूर परिसर
- नांदगाव पेठ, कुरणखेड, तरोडा कसबा – अमरावती-चिखली
- उंद्री – खामगाव-चिखली
- शेंबळ – वरोरा-वणी
- हिरापूर – गडचिरोली-मूल
- खरबी – नागभीड-आर्मोरी
- पांजरि, खुमारी, कामठी-कन्हान, मठानी – नागपूर बायपास
- चंपा – नागपूर-उमरेड
- भागेमारी, मिलानपूर, खांबारा – नागपूर-बैतुल मार्ग
- खडका, पावनगाव – नागपूर रिंगरोड
इतर मार्ग
- अनकधाळ, बोरगाव, इचगाव – सांगली-सोलापूर
- फुलवाडी, तळमोड, वळसांग, नंदानी – सोलापूर परिसर
- बावडा – इंदापूर-बोंडाळे (पालखी मार्ग)
- भवानीनगर, बडेवाडी – सातारा व पुणे परिसर
- विविध जिल्ह्यांमधील एकूण ९६ टोल प्लाझे
महत्त्वाचे मुद्दे
- पासची किंमत – ₹३,०००
- वैधता – १ वर्ष किंवा २०० टोल प्रवास (जे आधी पूर्ण होईल ते लागू)
- वापर – केवळ राष्ट्रीय महामार्ग व एक्सप्रेसवे
- अपवाद – राज्य महामार्ग व पालिका टोलवर वापरता येणार नाही