MSRTC Recruitment 2025 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात भरती जाहीर करण्यात आली असून यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. या पदांसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 11 ऑगस्ट 2025 आहे
एकूण पदे: ३६७
अर्जाची अंतिम तारीख: ११ ऑगस्ट २०२५
अर्ज पद्धती: ऑनलाईन
अधिकृत संकेतस्थळ: www.apprenticeshipindia.gov.in
रिक्त पदांची माहिती
खालील ट्रेडसाठी ही भरती होत आहे:
- अभियांत्रिकी पदवीधर
- मॅकेनिक मोटार व्हेईकल
- शिटमेटल वर्कर
- मॅकेनिक (ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स)
- वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक)
- पेंटर
- मॅकेनिक डिझेल
- इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक
- मॅकेनिक (रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग)
- इलेक्ट्रिशियन
- फिटर
- टर्नर
- कारपेंटर
शैक्षणिक पात्रता
- संबंधित ट्रेडमधील ITI उत्तीर्ण,
- किंवा अभियांत्रिकी पदवी / डिप्लोमा असणे आवश्यक.
वयोमर्यादा
- उमेदवाराचे वय किमान १४ वर्षे आणि कमाल ३० वर्षे असावे.
प्रशिक्षणाचे ठिकाण
- नाशिक, महाराष्ट्र
अर्ज करण्याची प्रक्रिया
- सर्वप्रथम उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी (Registration) करावी.
- त्यानंतर, लॉगिन करून संबंधित पदासाठी ऑनलाईन अर्ज भरावा.
- अर्ज भरल्यानंतर, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, विभागीय कार्यालय, एन. डी. पटेल रोड, शिंगाडा तलाव, नाशिक येथे अर्जाचा नमुना उपलब्ध होईल.
- तो नमुना भरून संबंधित कार्यालयात सादर करावा.
महत्त्वाचे लिंक
टीप: ही भरती “शिकाऊ उमेदवार (Apprentice)” पदासाठी असून, उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज वेळेत सादर करावा.