New Pay Commission:आठवा वेतन आयोग : सुधारित वेतनश्रेणी लागू होणार सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने आठवा वेतन आयोग लागू करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, तो १ जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहे. या आयोगाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी सुधारणा होणार आहे.
राज्य कर्मचाऱ्यांना इतकी पगार वाढ होणार? आठवा वेतन आयोगानुसार नवा अपेक्षित पे स्केल जाणून घ्या!
फिटमेंट फॅक्टरच्या आधारे वाढ
नवीन वेतन आयोगात वेतनश्रेणी निश्चित करताना फिटमेंट फॅक्टर हा महत्त्वाचा घटक मानला जातो. याच फॅक्टरच्या आधारे कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारात वाढ केली जाते. आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टरमध्ये २.०० पट वाढ लागू करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सुधारित वेतनश्रेणी तक्ता
फिटमेंट फॅक्टर वाढवल्यानंतर कर्मचाऱ्यांची वेतनश्रेणी बदलणार असून, त्यानुसार पगारात लक्षणीय फरक पडेल. संभाव्य सुधारित वेतनश्रेणीचा तक्ता लवकरच सरकारकडून जाहीर करण्यात येईल. या तक्त्यानुसार प्रत्येक पे-स्केलनुसार कर्मचाऱ्यांना नवीन पगार मिळणार आहे.

