खिशातून एकही रुपया न देता शेतकऱ्यांना मिळणार ₹36,000 पेन्शन – जाणून घ्या योजनेचा लाभ कसा घ्यायचा!

PM Kisan Mandhan Pension Scheme 2025 : जर आपण PM किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल, तर तुमच्यासाठी आणखी एक सुवर्णसंधी आहे. सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या PM किसान मानधन पेन्शन योजनेचा आपण लाभ घेऊ शकता. या योजनेअंतर्गत, उतारवयात आर्थिक आधार म्हणून दरमहा पेन्शन मिळते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

या योजनेचे फायदे काय?

  • दरमहा ₹3000 पेन्शन, म्हणजेच दरवर्षी ₹36,000 मिळू शकतात.
  • पेन्शन मिळवण्यासाठी स्वतंत्रपणे कोणतेही पैसे भरायची गरज नाही.
  • तुमच्या PM किसान योजनेतील ₹6000 अनुदानातूनच मासिक योगदान वजा होईल.

पात्रता (Eligibility):

  • उमेदवार PM किसान योजनेचा लाभार्थी असावा.
  • वय 18 ते 40 वर्षांदरम्यान असणे आवश्यक.
  • शेती करणारा लघु किंवा सीमांत शेतकरी असावा.

योगदान कसे व किती द्यावे लागते?

  • मासिक योगदानाचे प्रमाण तुमच्या वयानुसार ठरते.
  • उदाहरण: जर तुमचे वय 40 वर्षे असेल, तर दरमहा ₹200 योगदान दिल्यास पुरेसे आहे.
  • हे पैसे तुमच्या PM किसानच्या वार्षिक ₹6000 अनुदानातूनच दरवर्षी वजावे जातील.
    • उदा. ₹200 x 12 = ₹2400 दरवर्षी कापले जाईल.
    • उर्वरित ₹3600 तुमच्या खात्यावर जमा होतील.

नोंदणी प्रक्रिया कशी करावी?

  1. CSC केंद्र (सार्वजनिक सेवा केंद्र) येथे भेट द्या.
  2. सोबत खालील कागदपत्रे घ्या:
    • आधार कार्ड
    • बँक पासबुक
    • शेतीची कागदपत्रे
    • पासपोर्ट साइज फोटो
  3. CSC ऑपरेटर तुमचे ऑनलाइन फॉर्म भरतील.
  4. ऑटो-डेबिट फॉर्म सुद्धा तयार केला जाईल, ज्यामुळे तुमच्या बँक खात्यातून मासिक योगदान आपोआप वजावे जाईल.
  5. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर युनिक पेन्शन आयडी नंबर मिळेल.

नवीन अपडेट – PM किसानचा 20 वा हप्ता जमा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २ ऑगस्ट २०२५ रोजी देशभरातील ९.७ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात २० वा हप्ता जमा केला आहे.

जर तुम्ही लाभार्थी असाल आणि हप्ता मिळालेला नसेल, तर खालीलप्रमाणे तपासा:

वेबसाईट: https://pmkisan.gov.in
➡ तुमचे नाव, बँक डिटेल्स आणि ई-केवायसी अपडेट करून खात्री करा.

महत्त्वाचे मुद्दे:

  • ही योजना पूर्णतः स्वयंसेवी आहे.
  • वयाच्या 60व्या वर्षानंतर दरमहा ₹3000 पेन्शन मिळायला सुरुवात होते.
  • मृत्यू झाल्यास, पत्नीस पेन्शनचा 50% भाग मिळतो (पारिवारिक पेन्शन).

शेतकरी बांधवांनो, तुमच्या वृद्धापकाळात आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त आहे. आजच जवळच्या CSC केंद्रात जाऊन नोंदणी करा.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment